Supriya Sule demands that accused in the torture and rape case be hanged Swargate Bus Depo
मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनास्थळाचा आज सोमवारी खासदार सुप्रिया सुळेंनी आढावा घेतला.
पुणे : मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी घटनेच्या 70 तासांनंतर दत्तात्रय गाडे या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या घटनेनंतर केवळ पुणे जिल्ह्यातच नाही तर राज्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर काही राजकीय मंडळींनी घटनास्थळाचा आढावा घेतला. तर आज सोमवारी (ता. 3 मार्च 2025) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या घटनास्थळाचा आढावा घेतला. (Supriya Sule demands that accused in the torture and rape case be hanged Swargate Bus Depo)
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस डेपोतील व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणाहून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बलात्कार, अत्याचार यांसारखी प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून या घटनांमधील आरोपींना भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांनी हीच मागणी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावेळी सुद्धा केली होती. हीच मागणी त्यांनी आता पुन्हा केली आहे. त्यासोबतच सुळेंनी सरकारमधील मंत्र्यांना आणि आमदारांनाही त्यांच्या विधानावरून खडेबोल सुनावले आहेत.
(बातमी अपडेट होत आहे.)
Comments are closed.