Supriya Sule NCP SP on Pankaja Munde statement on Beed crime asj
बुलढाणा : गेल्या काही काळापासून राज्यात बीड प्रकरण चांगलेच गाजत आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले. शनिवारी (11 जानेवारी) भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी बीडला बदनाम केले जात असल्याचे विधान केले. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बुलढाण्यात पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानावरून टीका केली. (Supriya Sule NCP SP on Pankaja Munde statement on Beed crime)
हेही वाचा : Devendra Fadnavis : राजा होणं म्हणजे…चाणक्यांची आठवण काढत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
– Advertisement –
बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याची टीका केली होती. यावर प्रतिक्रिया विचारली असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कोणताही जिल्हा व्यक्तीमुळे नाहीतर कृतीमुळे बदनाम होतो. वाल्मिक कराडच्या कृती आणि कामाच्या पद्धतीमुळे जिल्हा बदनाम होत आहे.” असे म्हणत प्रत्युत्तर दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने या दोन्ही प्रकरणी संसदेत आवाज उठवला. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंके यांनीही हा विषय विधिमंडळात मांडला. या क्रूर आणि गलिच्छ घटनांमध्ये कोणीही राजकारण आणू नये” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
– Advertisement –
“बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटनांमध्ये माणुसकीच्या नात्याने आम्ही उभे आहोत. 33 दिवसानंतरही या दोन्ही घटनांमध्ये काही प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. पण अद्याप त्याची उत्तरे मिळालेली नाहीत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एक आरोपी अजूनही फरार आहे. वाल्मीक कराडला ईडीची नोटीस पाठवण्यात आली पण त्यावर काहीही कारवाई झाली नाही. मकोका अंतर्गत कारवाई करण्यासही सरकार धजावत नाही. वाल्मीक कराडला अटक झाली पण त्याची अटक कशी झाली? तो शरण कसा आला? हे बघितले तर नुसती चेष्टा सुरू असल्याचे दिसते.” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अनेक सवाल उपस्थित करत टीका केली.
Comments are closed.