Supriya Sule NCP SP on Uddhav Thackeray Shivsena UBT statement about Pawar as Brand


पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन गुरुवारी (19 जून) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना भाजपसह इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला. यावेळी भाजपला टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पवार आणि ठाकरे हे दोन ब्रॅंड आहेत. काहीजण हे ब्रॅंड संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत पवार यांचा ब्रॅंड असा उल्लेख केला. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Supriya Sule NCP SP on Uddhav Thackeray Shivsena UBT statement about Pawar as Brand)

हेही वाचा : Air India : दिवसभरातील एअर इंडियाची आठ उड्डाणे रद्द, प्रवाशांना पैसे मिळणार परत 

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आम्ही ब्रॅंड म्हणून नाही काम करत नाही. आम्ही राज्यात जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान, बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाला अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनीही हजेरी लावली होती. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भाषणापूर्वीच निघून गेल्या, त्यावर विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये सांगायच्या नसतात. काही गोष्टी या खासगीही असतात.” अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बारामतीमध्ये झालेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील करिअर आणि संधी’ या एकदिवसीय कार्यशाळेला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

बारामती अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, अटल इनक्युबेशन सेंटर, आयआयटी मुंबई, विद्या प्रतिष्ठान आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर आणि वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय एआय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर, शुक्रवारी या कार्यशाळेचा शेवटचा दिवस होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा शुक्रवारीच शेवटचा दिवस होता. त्यामुळेच अजित पवार हे ग्रामीण भागात कारखाना प्रचारासाठी फिरत असल्याने बारामतीतील या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित असल्याचे सांगितले गेले.



Source link

Comments are closed.