Supriya sule on evm and parbhani case maharashtra crime rates and chhagan bhujbal-ssa97


Supriya Sule On Maharashtra Crime : राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना अशोभनीय आहेत. परभणीतील घटनाही निंदणीय आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेकडून ( ठाकरे गट ) ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही पक्षांनी ‘ईव्हीएम’च्याविरोधात आक्रमक, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे.

ठोस माहितीशिवाय ‘ईव्हीएम’ला दोष देणार नाही, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं आहे. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. त्यामुळे एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गट ‘ईव्हीएम’वरून भाजपला लक्ष्य करत असताना सुप्रिया सुळे यांनी मित्रपक्षांच्या धोरणाला छेद देणारी भूमिका मांडल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

– Advertisement –

हेही वाचा : बीडमध्ये अर्बन नक्षल कोण आहेत, तुमची पोर की जावई? राऊतांचा फडणवीसांना सवाल

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ईव्हीएम यंत्रात फेरफार झाल्याचे ठोस पुरावे हाती असल्याशिवाय मी दोषारोप करणे योग्य ठरणार नाही. मी याच ईव्हीएम यंत्रावर चार निवडणुका जिंकल्या आहेत. ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळामुळे संशायस्पद वातावरण निर्माण झालं आहे. या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे. या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”

– Advertisement –

“ईव्हीएमबाबतच्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर त्या गोष्टी बाहेर येतील,” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

“राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना अशोभनीय आहेत. परभणीतील घटनाही निंदणीय आहे. अशा प्रकरणांत केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चालणार नाही. या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे. राज्यात पूर्वी इतके भीतीदायक वातावरण कधीच नव्हते. आता मलाही भीती वाटू लागली आहे. चित्रपटांमध्ये जे गुन्हेगारीचे चित्र दिसते, तेच आता या राज्यात पाहायला मिळत आहे,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : आरोपीला फाशी होईल सुनिश्चित करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे कल्याण घटनेबाबत पोलीस आयुक्तांना निर्देश



Source link

Comments are closed.