Supriya Sule : तिच्या अंगावर मारहाणीचे वळ होते, Vaishnavi Hagavane बाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
Supriya Sule : तिच्या अंगावर मारहाणीचे वळ होते, Vaishnavi Hagavane बाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
प्रकरणाची माहिती –
Vaishnavi Hagawane & Rajendra Hagawane Pune news: पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या मुलाला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, 7.5 किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या सनीज वर्ल्ड येथे झालेल्या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी हुंड्यात देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीविषयी विचारणा केल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले. (Pune Crime news)
अजित पवार वैष्णवीच्या लग्नाला आले होते. ते अर्धा-पाऊण तास लग्नात थांबले होते. ते वैष्णवी आणि शशांक यांना आशीर्वाद द्यायला आले होते. लग्नात हुंडा म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीकडे पाहून अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांना विचारले होते की, ही गाडी तुम्ही मागितली आहे की त्यांनी दिली आहे. तेव्हा तिथे अनेकजण उपस्थित होते. अजित पवारांनी राजेंद्र हगवणेंना विचारलेला प्रश्न ऐकून तेव्हा सगळेच हसले. अजित पवार यांनी खोचकपणे तो प्रश्न हगवणेंना विचारला होता, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.
Comments are closed.