‘…तर वैभवीचे वडील आज जिवंत असते’, वाल्मिक कराडला ‘हैवान’ म्हणत सुप्रिया सुळे संतापल्या; म्हण

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, वाल्मीक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे. तसेच, या प्रकरणात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे, तसेच हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्या या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना अवादा कंपनीने ज्यावेळी या हैवानच्या विरोधात तक्रार केली होती, त्याचवेळी याच्यावर कारवाई झाली असती, तर आज वैभवीचे वडील संतोष देशमुख जिवंत असते. मात्र, तसं झालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडचं सूत्रधार असल्याची माहिती दिली आहे. त्याबाबत आज प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमानुष पध्दतीने ही हत्या झाली आहे, त्यांना असं वागायची परवानगी दिलीच कोणी, कोणीतरी मोठी व्यक्ती यांच्या पाठीमागे आहे, त्याशिवाय यांची हत्या करण्याची हिम्मतच कशी झाली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे, त्याला पकडलं गेलं पाहिजे. मी कधीही खोटेनाटे आरोप करत नाही. अवादा कंपनीने ज्यावेळी या हैवानच्या विरोधात तक्रार केली होती. त्याचवेळी याच्यावर कारवाई झाली असती तर आज वैभवीचे वडील जिवंत असते. मात्र, तसं झालं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, दोन लोकांमुळे बीड बदनाम झालं आहे. बाकी बीडच्या लोकांचा यात काहीही दोष नाही. वाल्मिक कराडशी संबधित हार्वेस्टर पीक विमा यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी चौकशी लावेल असं आश्वासन मला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं होतं. त्यांना जाऊन विचारणार आहे या चौकशीचं पुढं काय झालं असंही त्यांनी म्हटलं आहे.

आरोपींमध्ये चार्जशीटमध्ये कोणाचा कितवा नंबर

वाल्मिक कराड – एक नंबर
विष्णू चाटे- दोन नंबर
सुदर्शन घुले – तीन नंबर
प्रतीक घुले – चार नंबर
सुधीर सांगळे – पाच नंबर
महेश केदार – सहा नंबर
जयराम चाटे – सात नंबर
फरार कृष्णा आंधळे – आठ नंबर

पाच साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना पाच महत्त्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराडविरोधात सर्व गुन्हे गोळा केलेले आहेत. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यानुसार वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे.

Comments are closed.