अजितदादांच्या अपघाताचा पारदर्शक तपास व्हावा; सुप्रिया सुळे यांची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे. या अपघातामागे नेमकी काय कारणे आहेत, याची चर्चा होत आहेत. तसेच या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. या अपघाताच्या चौकशी आणि तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले.

अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांच्या अपघाताची चौकशी आणि तपास पारदर्शक व्हावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. अजितदादांच्या अपघाताचा पारदर्शक तपास व्हावा अशी जनतेसह सर्वांचीच मागणी आहे. यावर वारंवार रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तसेच जय पवारांनीही त्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे दादांच्या अपघाताची पारदर्शच चौकशी व्हावी. या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याने पारदर्शकतेने तपास होणे गरेजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

राज्यातील सात जागांसाठी होणारी राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सात जागांसाठी सात उमेदवारांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामध्ये महायुतीच्या सहा जागा आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार निवडून जाणार आहेत, हे स्पष्ट आहे. गेल्या सहा दशकांपासून ज्या लोकांनी शरद पवारांनी साथ दिली ते लोक आजही आमच्यासोबत आहेत. बारामतीच्या लोकांचं मी आभार मानते. 1967 पासून सुरू झालेला पवार साहेबांचा राजकीय प्रवास हा बारामतीच्या जनतेमुळे आजही सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे आभार. आज बिनविरोध झालेल्या प्रत्येक उमेदवाराला शुभेच्छा, असेही त्या म्हणाल्या.

संसदेची पायरी चढतो ती संधी फक्त आणि फक्त बारातमी लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली आहे. जोपर्यंत त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहशील तोपर्यंत ही पायरी चढत राहशील ,असा सल्ला मला शरद पवारांनी दिला होता. तोच सल्ला मी पार्थला, एक आत्या म्हणून देते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोकसभा आणि राज्यसभेत कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचे. जेव्हा बोलायची वेळ येईल त्यावेळी अभ्यासपूर्ण बोलायचं. त्या ठिकाणी बसलेला व्यक्ती आपल्यापेक्षा ज्ञानी असतो आणि देश आपल्याकडे बघत असतो, असेही सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना सांगितले.

Comments are closed.