सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार राज्यसभेवर जावेत ही सर्वांचीच इच्छा!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शरद पवार यांनी राज्यसभेवर जावे ही सर्वांचीच इच्छा आहे. सगळय़ांचाच त्यांच्यासाठी आग्रह आहे हे आमचे भाग्य आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे शरद पवार यांच्यावर प्रेम आहे. आमचे सगळे सहकारी, पदाधिकारी यांची सगळय़ांचीच त्यांनी राज्यसभेवर जावे अशी इच्छा आहे.

राज्यसभा निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी मागितली आहे. मी काल संजय राऊत आणि अनिल देसाई यांना या विषयासंदर्भात विनंती केली. सगळय़ांचीच इच्छा असेल तर शरद पवार यांनी राज्यसभेवर जावे अशी विनंती सर्वांनी मिळून करूया, असे त्या म्हणाल्या.

Comments are closed.