Suresh dhas on walmik karad parli close and dhananjay munde


बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात अखेर वाल्मिक कराडला मकोका लावल्याचे कळाल्यानंतर मंगळवारी कराड समर्थक आक्रमक झाले. समर्थकांनी मंगळवारी परळी बंद केली. कुठे दगडफेक तर कुणी पेट्रोल ओतून आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. यावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खिल्ली उडवली आहे. आकाचे लोक मुंबईसुद्धा बंद करतील, काय सांगावे..; अशी टोलेबाजी सुरेश धस यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मंत्री धनंजय मंडे परळीत दाखल झाले आहेत, याबद्दल विचारल्यावर सुरेश धस म्हणाले, “परळी हा धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे. शांत करण्यासाठी मतदारसंघात आले असतील. परळी बंद करणे ही सुद्धा नावीन्यपूर्ण योजना आहे. ज्यानं एवढा मोठा उद्योग केला आहे. तो जेलमध्ये गेल्यावर समर्थनार्थ परळी बंद करा म्हणजे कितीपत योग्य आहे? आकाचे लोके एखाद्यावेळेस मुंबईसुद्धा बंद करतील, काय सांगावं….”

हेही वाचा : कराडवर लावण्यात आलेला ‘मकोका’ म्हणजे काय? किती शिक्षा असते? तो लावण्याचा अधिकार कुणाला असतो?

हत्या होण्याच्या आधी सुरेश धस वाल्मिक कराडला भेटले, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे, याबद्दल विचारल्यावर सुरेश धस यांनी म्हटलं, “कराडला मी भेटलो नाही. माझं आणि वाल्मिक कराडचं वाईट काहीच नव्हते. माझे चांगले संबंध होते. वाल्मिक कराड अशा पद्धतीनं माणसं मारायला लागल्यावर त्याचे समर्थन करायचं का? दोस्त किंवा मैत्री आहे, म्हणून असं वागल्यावर त्यांच्यासोबत राहायचं का? तुम्हाला पटत असेल, तर राहतो बाबा…”

राष्ट्रवादीचे बीड जिल्हा कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबत विचारल्यावर धस म्हणाले, “अजितदादा पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. विष्णू चाटे हा तालुक्याचा अध्यक्ष होता. मग, जिल्हा कार्यकारणीची बरखास्त करावी लागेल, नाहीतर इज्जतीचा पंचनामा होईल.”

“मी मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे नाराज नाही. मी पुढील पाच वर्षे विधानमंडळाचे काम करेल. सगळ्यात उजवे काम माझ्याकडून कसे होईल, यादृष्टीनं प्रयत्न असेल,” असा विश्वास धस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : मुंडेंचा राजीनामा घेण्यास अजितदादांचा नकार, शरद पवार म्हणाले, याचा निकाल…



Source link

Comments are closed.