टी 20 मध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड

सूर्यकुमार यादव भारताचा क्रमांक एकचा टी२० कर्णधार बनला आहे. ही कामगिरी करताना त्याने भारताचे माजी कर्णधार रोहित शर्माबरोबर विराट कोहली आणि एमएस धोनी यांनाही बरेच मागे टाकले आहे. टी२० मध्ये भारताचे ५० सामन्यात नेतृत्व करताना सूर्यकुमारने अधिक सामने जिंकले आहेत. यामुळे त्याची कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी सर्वोत्तम ठरली आहे. तसेच तो जगातील केवळ दुसराच कर्णधार ठरला, ज्याच्या विजयाची टक्केवारी सर्वाधिक आहे.
भारताने रविवारी (१ मार्च) आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मधील सुपर-८च्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. तो सूर्यकुमारचा कारकिर्दीतील भारताचा टी२० कर्णधार म्हणून ५०वा सामना होता. हा सामना भारताने जिंकला आणि तो भारताचा सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील ४०वा विजय ठरला. याबरोबरच त्याने रोहित आणि विराटला मागे टाकले आहे. भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याच्या टक्केवारीचा विक्रम रोहितच्या नावावर (७९.८३) होता.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सूर्यकमारच्या विजयाची टक्केवारी ८१.२५ आहे. त्याच्यापुढे अफगाणिस्तानचा असगर अफगाण आहे. त्याने ५० पेक्षा अधिक सामन्यात नेतृत्व केले आहे आणि त्याच्या विजयाची टक्केवारी ८१.७३ आहे. भारतीय कर्णधारांची यादी पाहिली तर विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची टक्केवारी ६४.५८ आहे. धोनीची टक्केवारी ५९.२८ आहे.
सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच भारताने त्याच्या नेतृत्वात २०२५मध्ये एशिया कपही जिंकला होता.
टी२० मध्ये भारताचे नेतृत्व करताना विजयाची टक्केवारी-
81.25 – सूर्यकुमार यादव (50 समोर)
७९. ८३ – रोहित शर्मा (६२ समोर)
64.58 – विराट कोहली (50 समोर)
५९. २८ – एमएस धोनी (७२ समोर)
त्याचबरोबर भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयाच्या यादीत सूर्यकुमार तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत रोहित ५० विजयासह पहिल्या स्थानावर आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने ७२ पैकी ४२ टी२० सामने जिंकले आहेत.
टी२० इतिहासात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय
रोहित शर्मा – ५० विजय (६२ समोर)
एमएस धोनी – ४२ विजय (७२ समोर)
सूर्यकुमार यादव – ४० विजय (५० समोर)
Comments are closed.