ज्याची भीती होती तेच घडलं! टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर कारवाई, ICCने सुनावली मोठी
सूर्यकुमार यादवला percent० टक्के इंड. पीएके अंतिम आशिया कप दंड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली आहे. आशिया कपदरम्यान भारत-पाकिस्तान सामन्यात घडलेल्या घटनेवर सुनावणी करून सूर्यकुमार यादवला दोषी ठरवण्यात आलं असून त्याच्यावर सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सूर्याकडून वादग्रस्त विधान
यावर्षी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले आहेत आणि दोन्ही वेळा भारताने पाकिस्तानला धुळ चारली. पहिला सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झाला होता, ज्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सनी विजय मिळवला होता. या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नव्हतं. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने माध्यमांशी बोलताना भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं असल्याचं विधान केलं होतं. याच प्रकरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तक्रार केली होती आणि आता आयसीसीने सुनावणीनंतर सूर्या दोषी असल्याचा निकाल दिला आहे.
Sury सूर्य आणि रफसाठी दंड 🚨 [Sahil Malhotra from TOI]
हॅरिस राउफ – 30% सामना शुल्क.
सूर्यकुमार यादव – 30% सामना शुल्क.
साहिबजादा फरहान – चेतावणी pic.twitter.com/fl9aavo5al– जॉन्स. (@Criccrazyjhons) 26 सप्टेंबर, 2025
सूर्यकुमार यादव काय म्हणाला होता?
पहिला सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. “मला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
सूर्यकुमार यादवकडून अपील दाखल
दरम्यान, सूर्यकुमार यादवने या कारवाई विरोधात अपील केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जो काही निर्णय होईल तो अंतिम मानला जाईल. आशिया कपच्या अंतिम सामन्याआधी भारत आणि श्रीलंका यांच्यात थोड्याच वेळात दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर लढत रंगणार आहे. यानंतर 28 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत आणि त्यादिवशी रात्रीपर्यंत आशिया कपचा विजेता कोण हे निश्चित होणार आहे. भारत-पाकिस्तानचे राजकीय संबंध तणावपूर्ण असल्यामुळे जेव्हा कधी दोन्ही संघ मैदानात भिडतात, तेव्हा एखादा तरी वाद पेटतो आणि नंतर चर्चेचा विषय ठरतो.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.