खुशी मुखर्जीवर 100 कोटींचा मानहानीचा दावा; सूर्यकुमार यादवचं प्रकरण न्यायालयात, नेमकं काय घडलं?
भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि अभिनेत्री खुशी मुखर्जी यांच्यातील वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अंसारी यांनी दावा केला आहे की, प्रसिद्धीसाठी खुशी मुखर्जीने भारताच्या टी-20 कर्णधारावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. यावर प्रतिक्रिया म्हणून फैजान यांनी खुशी मुखर्जीवर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला असून, तातडीच्या एफआयआरसह किमान 7 वर्षांची शिक्षा मागितली आहे.
सुरुवातीला, खुशी मुखर्जीने एका कार्यक्रमादरम्यान पापाराझींशी बोलताना स्पष्ट केले होते की ती कोणत्याही क्रिकेटरला डेट करत नाही आणि सूर्यकुमार यादव तिच्याशी सतत मेसेज करत असले, तरी आता त्यांच्यात कोणताही संवाद नाही. तसेच, तिचे नाव यादवशी जोडले जाऊ नये, असेही ती म्हणाली होती.
वाद चिघळल्यानंतर खुशी मुखर्जीने प्रकरणावर डॅमेज कंट्रोल सुरू केले. तिने सांगितले की तिचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारित झाले आहे आणि तिने आपले इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. तसेच सूर्यकुमार यादवशी झालेला संवाद फक्त मैत्रीपूर्ण होता आणि एका सामन्यानंतर सहानुभूती म्हणून केला गेला होता, असे तिने स्पष्ट केले.
सध्या सूर्यकुमार यादवने या प्रकरणावर कोणताही अधिकृत वक्तव्य केलेला नाही. तो आपल्या खेळावर आणि आगामी स्पर्धांवर लक्ष केंद्रित करत आहे. तर, फैजान अंसारींसाठी 100 कोटींचा दावा सिद्ध करणे मोठे आव्हान असले, तरी या प्रकरणामुळे खुशी मुखर्जीसमोर गंभीर कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गाझीपूर पोलिस आता दाखल झालेल्या लेखी तक्रारीची चौकशी करत आहेत. जर एफआयआर नोंदवण्यात आली, तर खुशी मुखर्जीला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
Comments are closed.