मैदानात फटकारलं, डोळेही वटारले…हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडल
सूर्यकुमार यादव-कुलदीप यादव व्हिडिओ T20 विश्वचषक 2026: भारताने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये (T20 World Cup 2026) पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये दमदार एन्ट्री मारली. आधी फलंदाजी आणि मग गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत पाकिस्तानला लोळावलं. मात्र या मोठ्या विजयानंतर मैदानावर एक घटना घडली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांच्यात आलबेल नसल्याचे समोर आले होते. या दरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच नेमकं काय घडलं?, यादरम्यानचा व्हिडीओ स्वत: सूर्यकुमार यादवने शेअर केला आहे. (Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video)
नेमके प्रकरण काय आहे? (सूर्यकुमार यादव-कुलदीप यादव व्हिडिओ)
दुसऱ्या डावातील 18व्या षटकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत होता. यावेळी पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेजवळ गेला, जिथे कुलदीप यादव (Kuldeep Yadav) उभा होता. झेल तुलनेने सोपा वाटत असताना तो त्याच्या हातातून सुटला आणि चेंडू सीमारेषेबाहेर गेला. या चुकीनंतर हार्दिक स्पष्टपणे नाराज दिसला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील या प्रसंगावर खुश नव्हता. दोघांनीही काही शब्द कुलदीपला सुनावल्याचे दिसून आले. त्या क्षणापासून वातावरण थोडे ताणले गेलेले जाणवत होते.पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन केले. मात्र कुलदीप यादव काहीसा नाराज दिसत होता. त्याने सूर्यकुमार यादवला मिठी मारली खरी, पण चेहऱ्यावर निराशा स्पष्ट होती. त्यानंतर कुलदीप यादव सूर्यकुमार यादवकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेले. याचवेळी सूर्यकुमार काहीतरी रागाने बोलताना दिसला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता सोशल मीडियावर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
भाऊ ही ती क्लिप आहे 👇 pic.twitter.com/XQ8BhCKRtT
— दिवस 1 ते एक दिवस (@jd_makwana__) १५ फेब्रुवारी २०२६
हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
सदर प्रकरणानंतर आता कर्णधार सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यात कोणताही वाद नाही, हे स्पष्ट झाले आहे. या व्हिडीओमध्ये, हॉटेलच्या परिसरात सूर्यकुमार यादवने कुलदीप यादवसोबत मैदानावरील क्षण पुन्हा तयार करतात. त्यात, कुलदीप यादव रागाने सूर्याच्या पाठीवर थाप मारतो आणि पुढे चालत जातो. यानंतर सूर्यकुमार यादव कुलदीपकडे आश्चर्याने पाहत बसतो. या व्हिडीओला तुझा राग सोडून दे भाऊ…, असं कॅप्शनही दिलं आहे.
भारत पाकिस्तानचा सामना कसा राहिला? (Ind vs Pak T20 World Cup 2026)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात सॅम अयुब आणि सलमान आगा यांना बाद करून पाकिस्तानला धक्का दिला. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.