अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, संघातून डच्चू मिळण्याची चर्चा, पण सूर्यकुमार यादवचं मन जिंकणारं उत्त
अभिषेक शर्मा T20 विश्वचषक 2026: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला सध्या सुरु असलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत अद्याप लय गवसलेली नाही. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) हा शून्यावर बाद झाला आहे. अभिषेक शर्मा हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, विश्वचषक स्पर्धेत अद्याप त्याने एकही धाव न काढल्याने अभिषेक शर्मा याला संघात ठेवावे की ठेवू नये, याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने पत्रकार परिषदेत बोलताना अभिषेक शर्माचे संघातील स्थान अजूनही भक्कम असल्याचे सांगितले.
अनेकजण अभिषेकच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त करत आहेत. पण मी अभिषेक शर्मा इथून पुढे ज्या संघांविरुद्ध खेळणार आहे, त्यांच्याबाबत चिंता करत आहे. आतापर्यंत अभिषेकच्या धावा झालेल्या नाहीत. पण एकदा तो त्याच्या फॉममध्ये येऊन खेळायला लागला तर काय होतं, ते तुम्हाला माहिती आहे. शेवटी क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. कधीतरी धावा होत नाहीत. अभिषेक शर्माकडून सर्वजण त्याच्या नेहमीच्या शैलीत खेळण्याची अपेक्षा करत आहेत. अभिषेकही नेहमीप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याकडून ते झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आम्ही सगळे त्याला सांभाळून घ्यायला आहोत. गेल्या वर्षभरात त्याने आम्हा सर्वांना सांभाळून घेतले आहे. यावेळी आम्ही त्याला कव्हर करु, असे सूर्यकुमार यादवने सांगितले.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अभिषेक शर्माच्या कामगिरीबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले. अभिषेक शर्मा तीन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला आहे. ही एकप्रकारे सकारात्मक बाब आहे. कारण आता तो योग्यवेळी चांगली कामगिरी करेल. भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या खेळात काही उणीवा आहेत. अद्याप भारतीय संघाची सर्वोच्च कामागिरी होणे बाकी आहे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले होते.
IND vs SA: आज सुपर-8 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आत सुपर-8 फेरीतील सामना होणार आहे. ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ अद्यापपर्यंत एकही सामना हरलेले नाहीत. भारतीय संघ अ गटातून पहिल्या स्थानावर होता. तर दक्षिण आफ्रिका ड गटातून पहिल्या स्थानावर होता. यापूर्वी 2024 च्या विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सुरु होईल.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.