पराभवानंतर टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; सपोर्ट स्टाफच्या प्लॅनवर सूर्या भडकला
IND vs SA T20 विश्वचषक 2026 : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा तब्बल 76 धावांनी पराभव करत धक्का दिला. या मोठ्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवही नाराज दिसला. सामन्यानंतर डगआउटमध्ये तो चेहरा पाडून बसला होता. त्यानंतर त्याने गौतम गंभीर आणि इतर सपोर्ट स्टाफसोबत सविस्तर चर्चा केली. पराभव कशामुळे झाली, कुठे चूक झाली आणि रणनीतीत काय त्रुटी राहिल्या यावर त्यांनी स्पष्ट मत मांडल्याचे दिसून आले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हरल्यानंतर सूर्यकुमार यादव डगआऊटमध्ये खूपच अस्वस्थ दिसत होता. तो गौतम गंभीर आणि उर्वरित सपोर्ट स्टाफशी गंभीर चर्चा करताना दिसला. pic.twitter.com/FDgxSGKIN4
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) 22 फेब्रुवारी 2026
पराभवानंतर डगआऊटमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार सपोर्ट स्टाफसोबत चर्चा करताना दिसतो. गौतम गंभीर त्याच्या प्रत्येक मुद्द्याकडे लक्षपूर्वक ऐकत असल्याचेही स्पष्ट होते. सामन्यापूर्वी आखलेल्या रणनीतीबाबत सूर्यकुमार नाराज असल्याचे त्याच्या देहबोलीवरून जाणवत होते. या पराभवाने सूर्यकुमार यादव खूपच निराश झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तर दुसरीकडे, सपोर्ट स्टाफ शांतपणे कर्णधाराचे म्हणणे ऐकत होता. या घडामोडींमुळे संघातील वातावरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचा थरार (IND vs SA T20 World Cup 2026)
सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 187 धावांचा डोंगर उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत 111 धावांवर गारद झाला. परिणामी भारताला 76 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर याने 63 धावांची स्फोटक खेळी करत सामन्याचं चित्रच पालटलं. त्याच्या आक्रमक फटक्यांनी भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने अवघ्या 24 चेंडूमध्ये 44 धावांची तुफानी खेळी साकारत डावाला निर्णायक वळण दिलं. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्टब्सने अक्षरशः धुरळा उडवला आणि तब्बल 20 धावा चोपल्या—इथेच सामना भारताच्या हातातून निसटला.
भारताकडून एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सततच्या विकेट्समुळे दबाव वाढत गेला आणि धावगतीही खालावली. फक्त शिवम दुबेने 42 धावांची झुंजार खेळी करत थोडा प्रतिकार केला, पण तो अपुरा ठरला. एकंदरीत, दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीतील आक्रमक फलंदाजी आणि शेवटच्या षटकांतील धडाकेबाज फिनिशिंगमुळे भारताचा पराभव निश्चित झाला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.