8 फलंदाज, 3 गोलंदाज… वर्ल्डकपआधी कर्णधाराने टीम इंडियाच्या विजयाचा फॉर्म्युला सांगून टाकला

सूर्यकुमार यादव इंडस्ट्रीज विरुद्ध न्यूझीलंड पहिला T20 : भारताने पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर हा विजय भारतीय संघासाठी, विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी दिलासादायक ठरला. सामन्यानंतरच्या पोस्ट-मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने संघाच्या रणनीतीसह कामगिरीवर सविस्तर भाष्य केले.

विजयानंतर काय म्हणाला कर्णधार सूर्या?

सूर्यकुमार यादव म्हणाला की, “8 फलंदाज आणि 3 स्ट्राइक गोलंदाजांसह मैदानात उतरणे आमच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. ही रचना सध्या संघ म्हणून चांगली काम करत आहे. जेव्हा एखादी गोष्ट योग्य चालू असते, तेव्हा ती पुढेही सुरू ठेवावी, असं मला वाटतं.”

मोठ्या धावसंख्येचे महत्त्व अधोरेखित करताना सूर्या म्हणाला की, दव असले तरीही बोर्डवर मोठी धावसंख्या उभे करणे ही सकारात्मक बाब आहे. पॉवरप्ले मध्ये आम्ही 25 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतरही फलंदाजांनी संयम सोडला नाही. 15व्या षटकापर्यंत आम्ही डाव सावरला आणि नंतर सर्व फलंदाजांनी मोकळेपणाने फटकेबाजी केली. बोर्डवर धावा असल्या की आत्मविश्वास आपोआप वाढतो,” असेही त्याने सांगितले.

कॅच सुटल्यावर दिले स्पष्टीकरण

भारतीय संघाने या सामन्यात काही सोपे कॅच सोडले. याबाबत विचारले असता सूर्यकुमार यादवने आपल्या खेळाडूंवर जास्त कठोर भूमिका घेण्याऐवजी त्यांना पाठिंबा दिला. “इतके दव असल्यामुळे काही कॅच हातातून सुटतात. अशा परिस्थितीत चुका होतात. पण मी माझ्या फील्डर्सच्या पाठीशी ठाम उभा आहे,” असे तो म्हणाला.

पुढे तो म्हणाला, “हो, या विभागात सुधारण्याची गरज आहे आणि आम्ही त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सामन्यात आम्ही अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करतो. आज पोरांनी जे प्रयत्न केले, त्यावर मी खूप खूश आहे.” या विजयासह टीम इंडियाने केवळ मालिकेत आघाडी घेतली नाही, तर वर्ल्ड कपपूर्वी आपली ताकद आणि आत्मविश्वासही दाखवून दिला आहे.

हे ही वाचा –

Ind vs Nz 1st T20 Turning Point : सामना फिरवला अन् रक्तबंबाळ झाला, न्यूझीलंडचा पराभव तिथेच ठरला; पहिल्या टी-20 मधील टर्निंग पॉइंट कोणता?

आणखी वाचा

Comments are closed.