रोहित शर्माला मागे टाकत सूर्यकुमार यादवची शानदार कामगिरी! या बाबतीत ठरला नंबर-1 खेळाडू!

भारत आणि ऑस्ट्रेलिया (T20 series IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेचा शेवटचा सामना 8 नोव्हेंबरला ब्रिसबेनमधील गाबा मैदानावर होणार आहे. त्याआधी 6 नोव्हेंबरला चौथा टी-20 सामना झाला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 2 षटकार ठोकले आणि यामुळे तो दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांवर टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.

सूर्यकुमारने रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकले, ज्याच्या नावावर 41 षटकार होते. आता सूर्याच्या नावावर 43 षटकार झाले आहेत.

त्याचबरोबर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर 30 षटकार आहेत, केएल राहुलकडे (KL Rahul) 28 षटकार आहेत, तर युवराज सिंगकडे (Yuvraj Singh) 26 षटकार आहेत.

म्हणजे आता सूर्या या देशांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू म्हणून नंबर 1 खेळाडू ठरला आहे.

Comments are closed.