हा विजय शूरवीर भारतीय सैन्याला समर्पित, पाकची धूळदाण उडवल्यानंतर सूर्यकुमार यादवने मनं जिंकली,
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमारने त्याच्या वाढदिवशी पाकिस्तानला हरवून भारताला आशिया कप-2025 च्या सुपर-4 मध्ये जवळजवळ नेले. 14 सप्टेंबर हा सूर्यकुमारचा वाढदिवस आहे आणि या दिवशी त्याने कर्णधारपदाची खेळी खेळून आपल्या संघाला विजयाकडे नेले. भारतात या सामन्याला खूप विरोध झाला आणि त्याचे कारण एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला होता. बीसीसीआय आणि सरकारसह, देशभरातून टीम इंडियाच्या खेळाडूंवरही टीका होत होती. दरम्यान, सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि देशाला एक संदेश दिला.
खटलार्यकुमार यादवने वाहिली पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली –
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो.
आणखी वाचा
Comments are closed.