पराभवानंतर सूर्या खचला! कोणावर फोडलं पराभवाचं खापर?, कॅप्टनने जाहीरपणे नाव घेतलं, म्हणाला…

सूर्यकुमार यादव भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक 2026 अद्यतने : टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) सुपर-8 मधील महत्त्वाच्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. सुपर-8 मध्ये पहिल्याच सामन्यात  भारताला दक्षिण आफ्रिकेकडून(South Africa)तब्बल 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. संघाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला असतानाच ही हार आल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 20 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. मात्र मधल्या षटकांमध्ये त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत 187 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तर भारतीय फलंदाजांचा डाव मात्र अक्षरशः कोसळला आणि संपूर्ण संघ 111 धावांवर आटोपला.

सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने स्पष्ट शब्दांत कबुली दिली की, गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली, पण फलंदाज अपयशी ठरले. “जर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असती, तर निकाल वेगळा लागला असता,” असे तो म्हणाला.

“पॉवरप्लेमध्येच सामना हातातून गेला…”

सूर्याने पुढे सांगितले, “180–185 धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये सामना जिंकता येत नाही, पण तिथेच सामना नक्की हरता येतो. आम्ही सुरुवातीलाच खूप विकेट गमावल्या. त्यानंतर छोट्या-छोट्या भागीदाऱ्या करता आल्या नाहीत. पण हाच क्रिकेटचा भाग आहे. आम्ही यापासून शिकू, बसून आढावा घेऊ आणि अधिक ताकदीने पुनरागमन करू.”

या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने 15 धावांत 3 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली, तर अर्शदीप सिंगने 28 धावांत 2 विकेट्स घेतल्या. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना सूर्यकुमार म्हणाला, “बुमराह–अर्शदीप ही जोडी किती घातक आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. दोघांनी मिळून आठ षटके टाकत जवळपास पाच विकेट घेतल्या आणि संघाला सामन्यात ठेवले. त्यांचा अनुभव आणि सातत्य आमच्यासाठी मोठी ताकद आहे.”

26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध निर्णायक लढत

भारताचा पुढील सुपर-8 सामना 26 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. सूर्यकुमार यादवने सांगितले की संघ आता अधिक सज्ज होऊन मैदानात उतरेल. “आमचा पूर्ण भर चांगल्या फलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी आणि धारदार क्षेत्ररक्षणावर असेल. आम्ही खेळ सोपा ठेवू आणि ज्या शैलीसाठी ओळखले जातो, तोच खेळ खेळू. संघ निश्चितच दमदार पुनरागमन करेल,” असा विश्वास त्याने व्यक्त केला.

हे ही वाचा –

Ind vs Sa Super 8 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचा ‘फुसका’ बार, ICC च्या स्पर्धेत अहमदाबादमध्ये भारत पुन्हा पराभूत, लाखो प्रेक्षक, कोट्यवधी चाहत्यांमध्ये सन्नाटा

आणखी वाचा

Comments are closed.