पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी सूर्यकुमार यादवची 5 मोठी विधाने! प्लेइंग 11 बाबत दिले महत्त्वाचे संकेत

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 2 सामने जिंकले असून, उद्याचा विजय एका संघाचे ‘सुपर-8’ मधील स्थान निश्चित करेल. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पत्रकार परिषदेत पाच मोठी विधाने केली आहेत.

सूर्यकुमारने स्पष्ट संकेत दिले आहेत की, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma is back) संघात परतणार आहे. पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगाच्या विधानावर मिश्किल टिप्पणी करत सूर्या म्हणाला, जर पाकिस्तानच्या कर्णधाराची इच्छा असेल, तर आम्ही अभिषेक शर्माला नक्कीच खेळवू.

पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिकबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, “जर परीक्षेत अभ्यासाबाहेरचा (Out of syllabus) प्रश्न आला, तर आपण तो सोडून देत नाही, तर त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अशा विचित्र अ‍ॅक्शन असलेल्या गोलंदाजांविरुद्ध सराव केला आहे आणि आम्ही त्यानुसारच प्लॅन बनवू.

हस्तांदोलनाबाबत (Handshake) निर्णय सूर्यावर सोपवणाऱ्या सलमान आगाला उत्तर देताना सूर्या म्हणाला, “फक्त 24 तास वाट पाहा. आज छान जेवण करा आणि शांत झोप घ्या, उद्या काय होईल ते आपण पाहूच.

पाकिस्तानच्या कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला, पाकिस्तान सध्या चांगले क्रिकेट खेळत आहे. ते गेल्या काही काळापासून श्रीलंकेतच सराव करत आहेत, त्यामुळे त्यांना येथील वातावरणाचा फायदा मिळू शकतो.

दबावाबद्दल बोलताना सूर्याने प्रांजळपणे कबुली दिली, दबाव नेहमीच असतो. आपण कितीही म्हटले की हा ‘केवळ एक खेळ’ आहे, तरीही भारत-पाकिस्तान सामन्यात दबाव असणे साहजिक आहे. आपण त्यांच्यासोबत वारंवार खेळत नाही, त्यामुळे हा सामना नेहमीच विशेष असतो.

Comments are closed.