टीम इंडियातून वगळताच सूर्यकुमार यादवचा दणका! 200 च्या स्ट्राईक रेटने फटकावल्या इतक्या धावा
सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) केवळ टीम इंडियाच्या कर्णधारपदावरूनच नाही, तर संघातूनही वगळण्यात आले आहे. अशा कठीण काळात सूर्यकुमार सध्या ‘टी20 मुंबई लीग’मध्ये खेळत आहे. तिथे त्याने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोमवारी ‘एमएससी मराठा रॉयल्स’ आणि ‘ट्रायम्फ नाइट्स MNE’ यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना एमएससी मराठा रॉयल्सचा संघ 152 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, सूर्यकुमार यादवने ‘ट्रायम्फ नाइट्स’कडून खेळताना अवघ्या 36 चेंडूत 72 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 13 चौकार आणि 1 षटकार लगावला आणि नाबाद राहून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात नूतन कुमार गोयलनेही 42 चेंडूत 56 धावा केल्या.
याच वर्षी मार्च महिन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2026 जिंकला होता. मात्र, त्या संपूर्ण स्पर्धेत आणि त्यानंतरच्या आयपीएलमध्येही सूर्याची कामगिरी खूपच खराब झाली होती. त्यामुळे त्याला संघातून डच्चू मिळणे अपेक्षित होते.
बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सूर्यकुमारला संघात स्थान दिलेले नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) टी20 संघाचा नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे. आता सूर्यकुमार यादवला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी अशाच स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.
Comments are closed.