अमृता फडणवीसांचा बेदरकारपणा सनातनी संस्कृतीला चपराक, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर हल्ला

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Sushma andhare on Amruta Fadnavis : दोन वर्षांपूर्वी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या वेशभूषेवर वारंवार भाष्य केलं होतं. उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सवर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्षेप घेतला होता. याचाच दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो पोस्ट करत मोठी पोस्ट लिहिली आहे. अमृता फडणवीस यांनी सनातनी संस्कृतीला चपराक लावली असल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सुषमा अंधारे यांची पोस्ट जशीच्या तशी 

मागे उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून भाजप मधल्या एक विचित्र बाई आकांडतांडव करत होत्या.  तेव्हाही मला जे वाटत होतं तेच आताही अमृता फडणवीसांच्या चौपाटीवरच्या वेशभूषेवरून ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल वाटते. 
 पक्षीय राजकारणापेक्षा बाई म्हणून आपली भूमिका जास्त महत्त्वाची नाही का?

अमृता फडणवीस यांनी आपल्या व्यवसाय निवडी बद्दल किंवा वेशभूषा केशभूषा एकूण राहणीमान याबद्दल दाखवलेला बेदरकारपणा हा इथल्या सनातनी संस्कृतीला लगावलेली जबरदस्त चपराक आहे..!!  सोकॉल्ड संस्कृती रक्षक अमृता फडणवीस यांच्या या बेदरकार वागण्याने पुरते जखमी झाले आहेत आणि त्यांचा विरोध सुद्धा अतिशय लूळापांगळा  झाला आहे. मनोहर कुलकर्णी सारख्या माणसांचे तथाकथित संस्कृती रक्षणाबद्दल चे सगळे संकेत नुसते धुडकवलेच नाही तर मनोहर कुलकर्णी च्या वैचारिक अस्तित्वाच्या पार चिंध्या चिंध्या करून टाकल्यात. उर्फी जावेदच्या निमित्ताने लिहिलेली पोस्ट पुन्हा एकदा इथे शेअर करत आहे.

"मी साडी नेसते.  मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. 
पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो.  कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच… 

अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? 

आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना )  मारहाणीची भाषा कराल का?  नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.  #सत्तेचा_माज #arrogance

इतर महत्त्वाच्या बातम्या 

South Cinema Kajal Aggarwal Shuts Down: ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यूच्या सोशल मीडियावर बातम्या; अभिनेत्रीनं स्वतः पोस्ट करुन फेटाळलं वृत्त

Bollywood Actress Struggle Life: जन्म सेलिब्रिटी कुटुंबात होऊनही नशीबी आलं रिजेक्शन, नंतर तिन्ही खान्ससोबत दिल्या सुपरहिट फिल्म्स; आज बॉलिवूडच्या नामांकीत कुटुंबाची सून

Comments are closed.