सुनेत्रा पवारांच्या ड्रायव्हरला अचानक खाली उतरवून सुनील तटकरेंच्या मुलाने स्वत: स्टेअरिंग हातात

अनिकेत तटकरे यांच्यावर सुषमा अंधारे : चिपळूण येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) सावर्डे येथे उपस्थित राहिल्या होत्या. त्या खासगी हेलिकॉप्टरने सावर्डेपर्यंत आल्या आणि तेथून पुढे विवाहस्थळापर्यंत चारचाकी गाडीतून गेल्या. मात्र, या प्रवासादरम्यान एक वेगळीच बाब समोर आली आहे. गाडीत असलेल्या शासकीय चालकाला खाली उतरवून अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी स्वतः गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाची घटना घडलेली असल्याने सुरक्षा आणि प्रोटोकॉलच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अनिकेत तटकरेंनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे सांगत विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. आता या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Sushma Andhare on Aniket Tatkare: नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने हलगर्जीपणा केला जात आहे. अनिकेत तटकरे यांनी प्रोटोकॉल तोडला आहे. सुनील तटकरे यांचे चिरंजीव म्हणून त्यांना विशेष प्राधान्य दिले जाते का? सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेबाबत असा हलगर्जीपणा होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरे यांची देखील चौकशी झाली पाहिजे. तटकरे यांना जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Aniket Tatkare: अनिकेत तटकरेंचं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणावर अनिकेत तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अनिकेत तटकरे म्हणाले की, आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या लग्नासाठी काकी काल सावर्डे येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचे मी सारथ्य मी केले. याआधीही अनेक वरिष्ठ नेत्यांचे सारथ्य केले आहे. त्यामुळे कारण नसताना हा वाद का वाढवला जातोय. हे माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे आहे. राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्य येतात, त्यांचं स्वागत करणे, सारथ्य करणे यात गैर वाटत नाही. सुनेत्रा पवार ज्या वाहनाने विवाहस्थळापर्यंत पोहोचल्या ते शासकीय वाहन नव्हते. त्यामुळे त्यात शासकीय चालक देखील नव्हता. काकी येणार म्हणून मी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्ही एक खासगी वाहन उपलब्ध केले होते. याआधी दादांकरता देखील असे नियोजन आम्ही करत होतो. त्यामुळे खासगी वाहनात चालक म्हणून बसणे यात मला गैर वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आणखी वाचा

Minority Status Certificates: अजित पवार हयात असतानाच ‘तो’ निर्णय, अल्पसंख्याक विभागाचा दावा; 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात नवा ट्विस्ट

आणखी वाचा

Comments are closed.