Sushma Andhare targets Babanrao Lonikar for controversial statement


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग लाचार असे म्हणत आमदार बबनराव लोणीकर यांच्याबद्दल एक पोस्ट केली आहे.

(Andhare on Lonikar) मुंबई : सत्ताधाऱ्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहे. सध्या भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांचे नाव याबाबतीत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मतदारांना धमकावल्याचे समोर आले होते. तर, आता सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकणाऱ्याला सुनावताना अरेरावीची भाषा केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत़्या सुषमा अंधारे यांनी, खुशमस्करे नेत्यांची संख्या वाढत चालली असल्याचा टोला लगावला आहे. (Sushma Andhare targets Babanrao Lonikar for controversial statement)

सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर भाजपा आमदार लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील परतुर येथे भाषण करत असताना आगपाखड केली. “कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केला आहे. तर, नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बुट-चप्पल सुद्धा सरकारमुळेच आले असल्याचे लोणीकर यांनी म्हटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग लाचार असे म्हणत आमदार बबनराव लोणीकर यांच्याबद्दल एक पोस्ट केली आहे. बबनराव लोणीकर तुमचे हे वागणे बरे नव्हे. तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा, जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे. जनता कष्टाने कमवून खाते, पण तुम्ही भ्रष्टाचार करून खाता, असे त्यांनी सुनावले आहे. सत्ताधाऱ्यांना कुर्निसात करताना खुशमस्करे नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. पाठीचा कणा हरवलेले लोणीकर यांच्यासारखे कळपाने सापडतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आमदार बबनराव लोणीकर यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात मतदारांना धमकावल्याचे समोर आले होते. जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आठ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी भाषणात लोणीकर यांनी मतदानाबद्दल गावकऱ्यानां इशारा दिला होता. हे टॉपचं गाव आहे म्हणून तुम्हाला 8 कोटी रुपये देऊन ठेवले होते. मते कमी झाल्यामुळे आता कॅन्सलही करता येत नाही. चूकभूल होत राहते. मी एकदा चव पाहीन, दोनदा आणि तीनदा पाहीन, नंतर म्हणेन, फुली हाणा. ही वेळ येऊ देऊ नका”, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा – Sanjay Raut : हे लोकं राज्यातील जनतेला लाचार समजतात, लोणीकरांच्या विधानावरून राऊतांचा हल्लाबोल





Source link

Comments are closed.