Sushma Andhare targets Fadnavis by mentioning Dhas msj


पिकविमा, मल्टीस्टेट बँक घोटाळे, खून-अपहरण-खंडणी यात गुन्हेगार, आका आणि आकांचे आका यांना शिक्षा होण्यासाठी आमदार सुरेश धस जंग जंग पछाडत आहेत. त्यांचा हा लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे.

(Santosh Deshmukh Murder) मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून त्यात भाजपा आमदार सुरेश धस आघाडीवर आहेत. त्याचाच संदर्भ देत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sushma Andhare targets Fadnavis by mentioning Dhas)

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विरोधकांनी लावून धरली आहे. भाजपाचे आमदार सुरश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबरच मुंडे यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांची भेट घेतली होती. तथापि, धनंजय मुंडे यांना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे.

– Advertisement –

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका कंपनीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा वाल्मीक कराडसह इतरांवर दाखल करण्यात आला आहे. 2 कोटी रुपयांमधील 50 लाख रुपये दोन महिन्यापूर्वीच दिले गेले होते. दीड कोटी रुपये बाकी असताना माणसे कोणी पाठवली? ही माणसे डायरेक्ट ‘आका’नेच पाठवली. ‘आका’च्याच आदेशाने हे लोक तिथे गेले, असे सांगत त्यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.

– Advertisement –

त्याच अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी ‘X’ या सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पिकविमा, मल्टीस्टेट बँक घोटाळे, खून-अपहरण-खंडणी यात गुन्हेगार, आका आणि आकांचे आका यांना शिक्षा होण्यासाठी आमदार सुरेश धस जंग जंग पछाडत आहेत. त्यांचा हा लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे त्यांच्याच आकांच्या हातात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Santosh Deshmukh Murder: Sushma Andhare targets Fadnavis by mentioning Dhas)

हेही वाचा – Awhad about bogus voting : हे कायद्याचे राज्य आहे, व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचा महायुतीवर निशाणा





Source link

Comments are closed.