वाळवंटात पाणी देणाऱ्या अणूच्या शोधाला नोबेल, ‘एमओएफ’मुळे जग बदलले, तिघा शास्त्रज्ञांचा गौरव

यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जपानचे सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेचे ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे. या तिघांनी तयार केलेल्या एमओएफ संरचनेमुळे विज्ञानात मोठी क्रांती घडली आहे. स्वीडनमधील रॉयल स्वीडिश अपॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली.
या तीन शास्त्रज्ञांनी वैशिष्टय़पूर्ण अणू तयार केले आहेत. त्यांच्या या छिद्रांमधून गॅसेस आणि इतर रासायनिक पदार्थ सहजपणे आत-बाहेर जाऊ शकतात. या नव्या प्रकारच्या संरचनांना मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स (एमओएफ) असे म्हणतात. या फ्रेमवर्कमध्ये विशिष्ट उद्दिष्टांसाठी कस्टम डिझाइन करता येतात. म्हणजेच ते एखादा विशिष्ट पदार्थ पकडू शकतात, साठवू शकतात किंवा रासायनिक अभिक्रियांना गती देऊ शकतात. त्यांचा वापर वाळवंटातील हवेतून पाणी गोळा करण्यासाठी, कार्बन डायऑक्साइड शुद्ध करण्यासाठी, विषारी वायू साठवण्यासाठी किंवा रासायनिक अभिक्रिया जलद करण्यासाठी केला जाऊ शकतो. विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे सुमारे 10.3 कोटी रुपये), सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. ही पारितोषिक रक्कम तिघांमध्ये विभागली जाईल. पुरस्कारांचे वितरण 10 डिसेंबर रोजी होईल.
Comments are closed.