छातीत गोळ्या घुसल्या अन् सीटवरचा टॉवेल लाल रंगाने माखून गेला, पोलीस तपास सुरू

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी पीए चंद्रनाथ रथ हत्या: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari ) यांचे पीए चंद्रनाथ रथ (Chandranath Rath) यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींमध्ये रक्तरंजित वळण मिळालं आहे. यामुळे राज्य पुरतं हादरुन गेलं आहे. अशातच या हत्याप्रकरणात अनेक खळबळजनक पण, महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

चंद्रनाथ रथ यांची रक्तानं माखलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नेमकं त्याच खिडकीच्या काचेवर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्या खिडकीजवळ ‘रथ’ बसले होते, गोळ्यांनुळे फुटलेली गाडीचं काच बरंच काही सांगून जातेय. गाडीच्या काचेवर गोळ्यांमुळे पडलेली छिद्र दिसतायत. तर सीटवर रक्तानं माखलेला टॉवेल आहे.

गाडीच्या खिडकीवर गोळ्यांमुळे पडलेली छिद्र एखाद्या अत्यंत प्रशिक्षित नेमबाजाचं कृत्य असल्याचं स्पष्टपणे दर्शवतायत. कारण गाडीच्या इतर कोणत्याही भागावर, चंद्रनाथ रथ बसलेल्या त्या विशिष्ट आसनाच्या खिडकीची काच वगळता, इतर ठिकाणी गोळीचे कोणतेही निशाण आढळत नाही. हल्लेखोरानं अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या, यावरून हा हल्ला एका अत्यंत काटेकोरपणे आखलेल्या आणि पूर्वनियोजित कटाचाच एक भाग असल्याचं सूचित करतं. चंद्रनाथ रथ यांची त्यांच्या घरापासून साधारणपणे 100 मीटर अंतरावर, अगदी याच ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घटनास्थळी एका वाहनाच्या फुटलेल्या काचेचे तुकडे विखुरलेले आहेत. कोलकाता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, सध्या फॉरेन्सिक तपास सुरू आहे.

भाजपचा थेट ममता बॅनर्जींवर आरोप (BJP Accuses Mamata Banerjee)

भाजपचे कार्यकर्ते आणि नेते रुग्णालयात येणं अजूनही सुरूच आहे. भाजपच्या ‘महिला मोर्चा’च्या (महिला आघाडीच्या) एका पदाधिकाऱ्यानं या हत्येसाठी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जबाबदार धरलं आहे.

नेमकं घडलं काय? (Chandranath Rath Murder Case)

भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (PA) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सुवेंदू यांचे हे सहाय्यक आपल्या गाडीनं घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अचानक एका अज्ञात वाहनानं त्यांचा रस्ता अडवला आणि त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबाराच्या धुमश्चक्रीत सुवेंदू यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांना तीन गोळ्या लागल्या, दोन छातीत आणि एक पोटात आणि त्यातच चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली असून कसून तपास सुरू आहे.

या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या तपासाचं मुख्य केंद्रबिंदू एक सिल्वर कलरची कार आहे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासातला हाच एक महत्त्वाची कडी पोलिसांच्या हाती लागली आहे, जी हल्लेखोरांपर्यंत पोहोचवू शकेल, असा पोलिसांचा ठाम विश्वास आहे. कोलकाता पोलिसांचे ADG, SP आणि IG हे वरिष्ठ अधिकारी आळीपाळीनं स्वतः या वाहनाची बारकाईनं तपासणी करत आहेत. तसेच, या कारची फॉरेन्सिक तपासणीही केली जाणार आहे. वाहनाच्या आतून कोल्ड्रिंगची बाटली, पाण्याची बाटली आणि रुमाल, टॉवेलसारख्या काही कापडी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक टीम संपूर्ण कारवरील फिंगरप्रिंटचं सखोल विश्लेषणही करत आहे. याचं कारण असं की, वाहनातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंवर हल्लेखोरांचे फिंगरप्रिंट असू शकतात, याच खुणांचे नमुने गोळा करून, कोलकाता पोलीस त्यांची त्यांच्याकडे असलेल्या क्रिमिनल डेटाबेससोबत पडताळणी करण्याची शक्यता आहे. जर एखाद्या नमुन्याचा विशिष्ट गुन्हेगाराशी मेळ बसला, तर त्यावरून थेट असा निष्कर्ष निघेल की, तो गुन्हेगार चंद्रनाथ रथ यांच्यासोबत कारच्या आत उपस्थित होता.

आरोपींनी हत्याकांड कसं घडवून आणलं? (Chandranath Rath Murder In Bengal)

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ यांची गाडी अडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या एका सिल्वर कलरच्या वाहनावर केंद्रित झालं आहे. रात्री साधारण 10:20 वाजता, जेव्हा चंद्रनाथ रथ यांचं वाहन मुख्य महामार्गावरून वळून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीत शिरले, जे त्यांच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर होते, तेव्हा हल्लेखोरांनी ही सिल्वर कलरची गाडी एका चौकात रथ यांच्या गाडीच्या अगदी समोर उभी केली. रथ यांची गाडी थांबताच, दुचाकीवरून आलेला आणि डोक्यावर टोपी घातलेला एक हल्लेखोर खाली उतरला आणि त्यानं सटासट चार गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या रथ यांच्या छातीत लागल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी ज्या ठिकाणी रथ यांची हत्या घडवून आणली, त्या जागेची अत्यंत विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक केल्याचा संशयही पोलिसांना आहे. या जागेमुळे हल्लेखोरांना पळून जाण्यासाठी अनेक मार्ग खुले होते. त्यामुळेच त्यांनी या जागेचा विचार केला , असा संशय पोलिसांना आहे.

सिल्वर कलरची ही गाडी रथ यांच्या हत्येच्या तपासातली महत्त्वाची बाब आहे. तसेच, ज्या ठिकाणी ही हत्या करण्यात आली, ते ठिकाण एक निवासी आणि दाट लोकवस्तीचा भाग आहे. याव्यतिरिक्त, जवळच एक सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा बसवण्यात आला आहे, जो या तपासात अत्यंत निर्णायक ठरेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, पोलीस सध्या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहेत, विशेषतः घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग वापरला, पळून जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला आणि नेमक्या कोणत्या ठिकाणापासून त्यांनी ‘रथ’ यांच्या वाहनाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती, या बाबींचा शोध ते घेत आहेत.

पाहा व्हिडीओ : Chandranath Rath Case : सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ यांना संपवण्यासाठी कट कसा रचला?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

West Bengal Suvendu Adhikari PA Shot Dead: बंगालमध्ये शुभेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या घालून संपवलं, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.