बारमध्ये 10 वाजेपर्यंत पार्टी; पुन्हा मित्रासह दिवेघाटात गेल्यानंतर अपघात 108 वरती केला कॉल, दत
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे: स्वारगेट परिसरात काही दिवसांपुर्वी झालेल्या बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांच्या सहाय्यक साहिल डोंगरे यांनी अपहरण करून दिवे घाटात नेले व तेथे मारहाण केल्याचा दावा केला होता. याबाबत हडपसर पोलिसांनी केलेल्या तपासात असा अपहरणाचा कोणताही प्रकार घडला नाही तर अॅड. साहिल डोंगरे हे दारू पिऊन बाहेर पडले व मोटारसायकलवरून जात असताना त्यावरून पडून जखमी झाल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले आहे. दरम्यान, स्वारगेट येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलासोबत ते काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
साहिल डोंगरे आणि त्यांचा मित्र अनिकेत मस्के हे गाडीतळ येथील सागर बारमध्ये 17 मार्च रोजी रात्री 10 वाजता गेले. तेथून बाहेर पडताना ते सीसीटीव्हीत दिसत आहेत. बारमधून अनिकेत मस्के हा घरी गेल्याचे सांगत आहे. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे डोंगरे हे रात्री साडेअकरा ते 18 मार्च पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान दिवे घाट येथे असल्याचे दिसून आले. डोंगरे यांनी 18 मार्च रोजी स्वतः 108 वर कॉल करून अपघात झाल्याचे सांगितले. डोंगरे हे ससून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
वकील डोंगरे यांचे अपहरण नव्हे तर अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांचे सहायक वकील डोंगरे यांचे अपहरण नव्हे तर अपघात झाल्याची माहिती आहे. वकिलाला अपहरण, मारहाण नव्हे तर अपघातामुळे जखमा झाल्याची शक्यता आहे. पुण्यातील वकील साहिल डोंगरे यांचा अपघात होऊन जखमी झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दारू पिऊन वकील डोंगरे एका हॉटेल मध्ये बाहेर पडत असल्याचे सीसीटिव्हीमधून समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल डोंगरे यांचे अपहरण करून त्यांना काही लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिल्याबाबत प्रसार माध्यमांवर बातमी फिरत होती. याप्रकरणी तपास केला असता साहिल डोंगरे हे रात्री सागर बार येथे रात्री 10 वाजता त्यांचे मित्र अनिकेत मस्के याच्यासोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसत असल्याचे सीसीटिव्हीमधून समोर आलं आहे.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे हे रात्री 11.30 वाजता व पहाटे 05 वाजता दिवे घाट येथे असल्याचे दिसून आले. डायल 108/112 वर कॉल झाल्याचे व सासवड पोस्टे येथील अंमलदार यांना कॉल झाल्याचे दिसून आले. पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक इसमाचा अपघात झाला असून तो बेशुद्ध असल्याचा फोन प्राप्त झाला. इतकच नाही तर डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचे पहाटे 108 वर फोन करून सांगितलं. त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील डायल 108 ॲम्ब्युलन्स आली व जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचारासाठी घेऊन गेले. एकंदरीत सदर इसमाचे कोणत्याही प्रकारे अपहरण झाले नसून त्यांचा रस्ते अपघात झाला आहे असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील वकील
शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील गाडे याने 26 फेब्रुवारीला पहाटे स्वारगेट बसस्थानकाच्या आवारात शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी दोन दिवस शोध मोहीम राबवून ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी गाडेला गुनाटमधून अटक केली होती. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांचे साहिल डोंगरे सहाय्यक आहेत.
& nbsp;
Comments are closed.