Swargate Crime victim statement recorded on camera
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली असून अखेरीस या घटनेतील पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेनंतर मानसिक धक्क्यामध्ये गेलेल्या पीडितेने मंगळवारी पहाटे नेमके काय घडले? याची माहिती दिली आहे.
पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी घटनेच्या 70 तासांनंतर आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली. या आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. परंतु, या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली असून अखेरीस या घटनेतील पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेनंतर मानसिक धक्क्यामध्ये गेलेल्या पीडितेने मंगळवारी पहाटे नेमके काय घडले? याची माहिती दिली आहे. (Swargate Crime victim statement recorded on camera)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदविण्यात आला. तरुणीने हा जबाब इन कॅमेरा नोंदवला आहे. त्यानंतर हा जबाब लिफाफा बंद पाकिटाच्या माध्यमातून न्यायालयात सादर करण्यात आला. पीडित तरुणीने तिच्या जबाबात स्वारगेट येथे 25 फेब्रुवारीला पहाटेच्या वेळी नेमके काय घडले? याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे त्या दिवशी नेमके काय घडले? याची संपूर्ण घटना न्यायालयासमोर उघड झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या घटनेनंतर ज्यावेळी आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आले, त्यावेळी त्याने धक्कादायक खुलासे केले. तर, आरोपीच्या वकिलांकडून हा प्रकार तरुणीच्या सहमतीने झाल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे पीडित तरुणी मानसिक धक्क्यात गेली होती. ज्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते.
स्वारगेट प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब नोंदविण्याआधी आरोपी दत्ता गाडेचा जबाब नोंदविण्यात आला होता. त्याशिवाय, त्याची रूग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली होती. पण आता या प्रकरणात मानसिक धक्क्यात गेलेल्या पीडितेचाही जबाब नोंदविण्यात आल्याने या प्रकरणात आणखी कोणता खुलासा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात पीडितेवरच आरोप केल्याने ती मानसिक धक्क्यात गेली होती. ज्यामुळे तिच्याकरिता दोन समुपदेशकांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता या तरुणीचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
तर, या प्रकरणी पीडित तरुणीचे वकील अॅड. असीम सरोदे म्हणाले की, वृत्तपत्र स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी न्यायालयात घडलेल्या घटनांचे वृत्तांकन केले पाहिजे. परंतु काही राजकारणी, अधिकारी आदी काही व्यक्ती खोट्या बातम्या पसरवत आहेत. न्याय मागण्यासाठी अर्ज करणाऱ्या पीडितेचे चारित्र्यहनन केले जात आहे, असे म्हणत सरोदेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या या प्रकरणातील आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी गाडे याला पोलिसांनी घटनेच्या 70 तासांनंतर शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून शुक्रवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Comments are closed.