Swargate rape case accused dattatray gade arrested by pune police from gunat shirur in marathi


स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून गाडेला पकडण्यात आलं असून अटकेनंतर त्याला पुण्यात आणण्यात आलं आहे.

Swargate Rape Case : पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून गाडेला पकडण्यात आलं असून अटकेनंतर त्याला पुण्यात आणण्यात आलं आहे. मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास दत्तात्रय गाडे याने पुण्यातील स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. गाडे याच्या अटकेमध्ये गुणाट गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांचे पोलिसांना मोठे सहकार्य मिळाले. गाडे याला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या संदर्भात पुढील तपास त्यांच्याकडून करण्यात येईल. (swargate rape case accused dattatray gade arrested by pune police from gunat shirur)

दत्ता गाडे नावाच्या नराधमाने 26 वर्षीय तरूणीवर स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे फरार होता. 25 फेब्रुवारीला (मंगळवारी) हा प्रकार घडला आहे. गाडेच्या मागावर पोलिसांची 13 पथके होती. या घटनेनंतर तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली. तसेच आरोपी दत्तात्रय गाडे याचे छायाचित्र प्रसिद्ध करून पोलिसांनी फरार आरोपीची सूचना देणाऱ्याला एक लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा देखील केली होती.

हेही वाचा – Swargate Case वडेट्टीवारांचे योगेश कदमांना खडे बोल, थोडी लाज शरम बाळगा; अंधारे म्हणाल्या, लवकर बरे व्हा; असं काय म्हणाले गृहराज्यमंत्री

आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावाचा रहिवाशी आहे. तरूणीवर अत्याचार केल्यानतंर गाडेने तातडीने पुणे शहर सोडले. तो थेट आपल्या गुणाट गावी गेला. गाडेने 25 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजल्यापासून मोबाइल बंद केला. मंगळवारी तो गावातील किर्तनाच्या कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. बुधवारी (26 फेब्रुवारी) सकाळपर्यंत तो गावातच होता. पण, दुपारी माध्यमातून त्याचे फोटो आणि नावासह बातम्या सुरू झाल्यावर तो गायब झाला.

आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याचे सांगितले जाते. शिरूर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे आरोपी गाडे ऊसात लपल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलिसांकडून ऊसाच्या शेतांमध्ये शोध घेतला होता. यासाठी श्वानपथक आणि ड्रोनचा वापर पोलिसांकडून केला जात आहे. गुनाट गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.

36 वर्षीय दत्तात्रय गाडे याच्यावर पुणे आणि आसपासच्या भागात चोरी, दरोडा, चेन-स्नॅचिंग असे किमान सहा गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या एका प्रकरणात त्याला 2019 मध्ये जामीन मिळाला होता.

हेही वाचा – Raj Thackeray : राज ठाकरेंची शिवाजी महारांजाना उद्देशून कविता; कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?



Source link

Comments are closed.