Sydney Attack – विश्वास बसत नाही की, माझ्या मुलाने दहशतवादी हल्ला केला; हल्लेखोराच्या आईची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील सिडनी येथे झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सिडनीच्या बोंडी बीचवर हनुक्का उत्सव साजरा केला जात होता. त्या संध्याकाळी दोन हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. हा हल्ला साजिद अकरम आणि नवीद अकरम या बाप लेकाने केला आहे. हल्ल्यात बापाचा मृत्यू झाला असून नवीद पोलिसांच्या ताब्यात आहे. हल्ल्यानंतर आता हल्लेखोराच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी हा हल्ला ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात मोठा यहूदी विरोधी हल्ला आहे. हल्ल्यात आरोपी 50 वर्षीय साजिद अकरम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा 24 वर्षीय मुलगा नवीद अकरम पोलीसांच्या ताब्यात आहे. टेलीग्रामच्या वृत्तानुसार, नवीदची आई वेरेना अकरम म्हणाली की, ”मला विश्वास बसत नाहीय की माझ्या मुलाने दहशतवादी हल्ला केला आहे, तो खूप चांगला आहे. त्याने कधी मद्यपान, धुम्रपानाला शिवलेही नाही. तो कधी वाईट संगतीतही नव्हता”. पुढे ती म्हणाली की, नवीद गवंडी काम करायचा. पण सध्या तो बेरोजगार आहे. नवीदचे वडील फळ विक्रेते होते. दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी, साजिद आणि नवीद मासेमारीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले.

ऑस्ट्रेलियातील एका इस्लामिक सेंटरच्या सोशल मीडिया पोस्टवरून असे दिसून आले की, नवीदने 2022 मध्ये धार्मिक शिक्षण पूर्ण केले. अल-मुराद इस्लामिक इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदम इस्माइल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. डेली मेलच्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर पोलिस संशयितांच्या घरी चौकशी करण्यासाठी पोहोचले. मात्र, तिथल्या लोकांनी त्यांना घेरून त्यांच्या तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर मूळचा पाकिस्तानचा असल्याने ऑस्ट्रेलियन तपास संस्था या दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध आहे का? त्याच्याही तपास करत आहेत.

Comments are closed.