सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये ईशान किशनचा धमाका! 10 षटकार आणि 6 चौकारांसह ठोकले वादळी शतक

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT 2025-26) 2025-26 चा अंतिम सामना आज, 18 डिसेंबर रोजी झारखंड आणि हरियाणा यांच्यात खेळला जात आहे. पुण्यात होत असलेल्या या महामुकाबल्यात झारखंडने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला आहे. झारखंडचा कर्णधार ईशान किशनने (Ishaan kishan) झंझावाती फलंदाजी करत हरियाणाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली.

कर्णधार ईशान किशनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत मैदानाच्या चहूबाजूंनी फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 45 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईशान किशनसोबतच कुमार कुशाग्रनेही उत्कृष्ट फलंदाजी करत चाहत्यांची मने जिंकली. या दोघांच्या तुफानी खेळीच्या जोरावर झारखंडने मोठी धावसंख्या उभारली आहे. ईशान किशनने या महत्त्वाच्या सामन्यात ज्या प्रकारे गोलंदाजांचा समाचार घेतला, त्यामुळे झारखंड संघ आता विजेतेपदाच्या शर्यतीत अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

ईशान किशन व्यतिरिक्त कुमार कुशाग्रनेही (kumaar Kushagra) आपले कौशल्य दाखवत हरियाणाविरुद्ध मैदान गाजवले. त्याच्या बॅटमधून एक वादळी अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली. कुशाग्रने अवघ्या 38 चेंडूंमध्ये 81 धावांची जबरदस्त खेळी करून खळबळ माजवून दिली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार ठोकले.

दोन्ही संघांकडे आपले पहिले विजेतेपद जिंकण्याची ही सुवर्णसंधी आहे. ईशान किशन सध्या भारतीय संघापासून दूर आहे. त्याने 2023 मध्ये शेवटचे भारताचे प्रतिनिधित्व केले होते, त्यानंतर तो संघात दिसला नाही. मात्र, टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी ईशान सध्या उत्कृष्ट कामगिरी आणि प्रचंड मेहनत करत आहे.

Comments are closed.