सय्यद मुरुसा अली ट्रॅफी – चेन्नई सुपर किंग्जने वाग्जने वाग्जने रिलिझल्या उडलिज उदलिज रुद्रावतार; स्फोटाने स्पोंटा खेळला

Syed Mushtaq Ali Trophy मध्ये IPL 2026 ला डोळ्यासमोर ठेवत हिंदुस्थानी खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. लवकरच आयपीएल 2026 साठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आयुष म्हात्रे, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, अमित पासी, देवदत्त पड्डीकल, सरफराज खान या खेळाडूंनी गेल्या काही दिवसांमध्ये शतकीय खेळी करत धुरळा उडवून दिला आहे. आता चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केलेल्या राहुल त्रिपाठीने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा यांच्यामध्ये आज (8 डिसेंबर 2025) सामना खेळला गेला. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 161 धावा केल्या. महाराष्ट्राकडून राहुल त्रिपाठीने एकट्याने खिंड लढवली आणि 44 चेंडूंमध्ये नाबाद 83 धावांची झुंजार खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी करत धावसंख्येला गती देण्याचे काम केले. मात्र, इतर फलंदाजांची त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. महाराष्ट्राने दिलेल्या 162 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना गोव्याला महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी गुंडाळले आणि 146 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला आणि महाराष्ट्राने 15 धावांनी हा सामना जिंकला. गोव्याकडून ललीत यादवने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर महाराष्ट्राकडून जलाज सक्सेना, तनय सांघवी, विकी ओस्तवाल यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या तर राजवर्धनने एक विकेट घेतली.
Smriti Mandhana – लग्न मोडलं आणि दुसऱ्याच दिवशी स्मृती मानधना मैदानात, सरावाला केली सुरुवात

Comments are closed.