सीरियात कारमध्ये भीषण स्फोट, 19 जणांचा मृत्यू; 12 हून अधिक जण जखमी
पुन्हा एकदा सिरियात कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. महिन्याभरातील कारमध्ये स्फोट झाल्याची ही सातवी वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे.
एपीच्या वृत्तानुसार, उत्तर सिरीयन शहराबाहेर हा स्फोट झाला आहे. मानबिज शहराच्या बाहेरील भागात महिला कृषी कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाजवळ कारचा स्फोट झाला. रुग्णालयातील नर्सने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 18 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. स्थानिक सीरियन सिव्हिल डिफेन्सच्या म्हणण्यानुसार, इतर 15 महिला जखमी झाल्या, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटानंतर अद्याप कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मानबिजमध्ये एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत झालेला हा सातवा कार बॉम्बस्फोट असल्याचे नागरी संरक्षण विभागाचे उपसंचालक मुनीर मुस्तफा यांनी सांगितले.
Comments are closed.