सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सीरियातील एका न्यायालयाने येथील माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध याबाबत दोषी ठरवले आहे. याप्रकरणी बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर त्यांचे धाकटे बंधू माहेर अल-असद यांनाही मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सीरियामध्ये तब्बल 14 वर्षे चाललेल्या संघर्षादरम्यान जवळपास पाच लाख लोकांचा बळी गेला असून, याच गुन्ह्यांसाठी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर 2024 मध्ये सरकार पडल्यानंतर बशर आणि माहेर हे दोघेही रशियाला पळून गेले असून, तिथे त्यांना पुतिन सरकारने आश्रय दिला. याच प्रकरणात बशर अल-असद यांचा मामेभाऊ आणि सीरियन सैन्याचा माजी ब्रिगेडियर जनरल आतिफ नजीब यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नजीब रशियाला पळून जाण्यात अयशस्वी ठरल्यामुळे जानेवारी 2025 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान नजीब कैद्याचा गणवेश घालून एका पिंजऱ्यात उभा होते. 2011 मध्ये ते दारा प्रांतातील राजकीय सुरक्षा शाखेचा प्रमुख असताना, तिथे आंदोलकांवर क्रूर दडपशाही करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. या कारवाईमुळेच संपूर्ण सीरियामध्ये गृहयुद्धाची ठिणगी पडली होती. एपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत न्यायालयाने या ऐतिहासिक खटल्यात ही कठोर शिक्षा सुनावली आहे.

Comments are closed.