जगरहाटी – फ्रान्समध्ये खळबळ! संगीत महोत्सवात सुईहल्ला

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या देशव्यापी संगीत महोत्सवात सहभागी संगीतप्रेमींवर सीरिंज हल्ला झाला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी तब्बल 145 जणांना हात, पाय आणि पार्श्वभागावर इंजेक्शन टोचल्याचे समोर आले आहे. ही इंजेक्शन्स नेमकी कोणत्या प्रकारची आहेत, त्यातील औषधांमुळे मानवी शरीरावर काही घातक परिणाम होऊ शकतात का याचा तपास सुरू आहे. डेटिंगच्या निमित्ताने गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्याचा हा प्रयत्न नव्हता ना याचाही तपास केला जात आहे, असे फ्रान्स सरकारच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

Comments are closed.