श्रीलंकेला मोठा झटका, T20 संघाचा हा नंबर-1 गोलंदाज वर्ल्डकप 2026 मधून बाहेर
T20 विश्वचषक 2026 मध्ये शानदार सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचे मोठे नुकसान झाले आहे. स्टार फिरकी अष्टपैलू वानिंदू हसरंगा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, MRI स्कॅनमध्ये त्याच्या डाव्या पायाच्या स्नायूमध्ये गंभीर ताण असल्याचे समोर आले आहे, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हसरंगाने दुखापतीशी झुंज देऊनही चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या चार षटकात 25 धावा देत तीन महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकेने 164 धावांचे लक्ष्य राखले आणि आयर्लंडचा 20 धावांनी पराभव केला.
Comments are closed.