अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली-सूर्याला मागे टाकत ठरला टी20 क्रिकेटचा नवा बादशाह
अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सध्या टी20 क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळ करून शानदार कामगिरी करत आहेत. आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये (Asia Cup 2025) त्याने अतिशय शानदार फलंदाजी केली. आता ICC ची नवी टी20 आंतरराष्ट्रीय रँकिंग जाहीर झाली असून अभिषेक शर्माने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. त्याने इंग्लंडच्या डेव्हिड मलानला मागे टाकत टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रेटिंग मिळवणारा फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे.
अभिषेकने तब्बल 931 गुण मिळवले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. भारतासाठी टी20 रँकिंगमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने विराट कोहली (Virat Kohli &Suryakumar Yadav)आणि सूर्यकुमार यादव यांनाही मागे टाकले आहे.
भारतीय संघासाठी पदार्पण केल्यापासूनच अभिषेक शर्मा सातत्याने तुफानी खेळ करत आहे. तो आधीच टी20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये क्रमांक 1 वर होता. आता त्याने करिअरमधील सर्वाधिक रेटिंग मिळवली आहे. आशिया कपदरम्यान त्याने 931 गुण मिळवले आणि डेव्हिड मलानच्या 919 रेटिंग चा विक्रम मोडला. श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 सामन्यातील जबरदस्त खेळामुळे तो 931 गुणांवर पोहोचला. आशिया कप फायनलनंतर त्याचे गुण 926 वर आले असले तरीही तो अजूनही मलानपेक्षा खूप पुढे आहे.
आशिया कप 2025 अभिषेकसाठी अतिशय अविस्मरणीय ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 7 सामने खेळले व 314 धावा केल्या. त्याची सरासरी 44.86 इतका होती तर स्ट्राईक रेट तब्बल 200 इतका होता. त्याने या स्पर्धेत 32 चौकार आणि 19 षटकार ठोकले. अभिषेकने जवळजवळ प्रत्येक सामन्यात भारताला उत्तम सुरुवात करून दिली. फायनलमध्ये तो फारशी कामगिरी करू शकला नाही , तरीही टीम इंडियाने पाकिस्तानला हरवत आशिया कप 2025 चे विजेतेपद पटकावले.
Comments are closed.