IND vs ENG: कसोटीनंतर भारत-इंग्लंड पुन्हा आमनेसामने; ECB चे वेळापत्रक जाहीर
कसोटी मालिकेच्या रंगतदार ड्रॉ नंतर आता पुन्हा एकदा भारत आणि इंग्लंड मैदानावर खेळण्यास सज्ज झाले आहेत. यावेळी रंगणार आहे जलद गती, रोमांच आणि फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा T20I फॉरमॅट. 5 सामन्यांची टेस्ट मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यावर, टीम इंडिया जुलै 2026 मध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे, जिथे 5 सामन्यांची T20I मालिका रंगणार आहे.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने या बहुप्रतीक्षित मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले असून, ही मालिका 1 जुलै ते 11 जुलै 2026 दरम्यान खेळवली जाणार आहे. या रोमांचक सामन्यांचे वेन्यू डरहम, मँचेस्टर, नॉटिंगहॅम, ब्रिस्टल आणि साउथॅम्प्टन असे असतील.
ECB चा उद्देश या मालिकेद्वारे आपल्या संघाला 2026 T20 World Cup आधी दमदार तयारी करून देणे आहे. तर भारतासाठी हा दौरा अनुभव आणि प्रयोग दोन्हींसाठी योग्य व्यासपीठ ठरणार आहे.
क्रिकेटप्रेमींना या मालिकेत अनेक तरुण तारे आणि T20 स्पेशलिस्ट्स पाहायला मिळतील. सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून मैदानात उतरू शकतात, तर हार्दिक पंड्या त्यांच्या ऑलराऊंड परफॉर्मन्समुळे संघाला संतुलन देतील. ओपनिंगमध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा आक्रमक सुरुवात करतील, तर रिंकू सिंह फिनिशरची जबाबदारी सांभाळतील. गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल आणि रवि बिश्नोई यांच्याकडे असेल, तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही IPL मधून काही नवे चेहरे संघात दिसू शकतात.
फक्त पुरुष क्रिकेटपुरताच हा दौरा मर्यादित राहणार नाही. भारतीय महिला संघ देखील 28 मे ते 2 जून 2026 या कालावधीत इंग्लंड महिला संघाविरुद्ध 3 T20 सामने खेळणार आहे.
Comments are closed.