T20 WC 2026 – ‘चोकर्स’चा शिक्का कायम! आफ्रिकेला 9 विकेट्सनी लोळवत न्यूझीलंड फायनलमध्ये, एलेनचा शतकी झंझावात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पहिल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या लढतीत दक्षिण आफिकेने विजयासाठी दिलेले 169 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 12.5 षटकात लिलया पार केले. सलामीवीर फिन एलेन याने शतकी तर टीम सैफर्ट याने अर्धशतकीय खेळी (58) करत संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले. एलेन याने अवघ्या 33 चेंडूत नाबाद 100 धावांची विक्रमी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 10 चौकार आणि 8 षटकारांचा पाऊस पाडला. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Comments are closed.