15 टीम क्वालिफाय, अहमदाबादमध्ये फायनल; 2026 च्या टी-20 वर्ल्डकपची मोठी अपडेट, पाकिस्तान भारतात
टी 20 विश्वचषक 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 ची स्पर्धा (T20 World Cup 2026) 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान खेळवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेचं यजमानपद करणार आहेत. याचदरम्यान, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात अंतिम सामन्याच्या तारखा आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना 8 मार्च रोजी होऊ शकतो. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबो येथे खेळवला जाऊ शकतो. पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाहीय. त्यामुळे पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहोचल्यास टी-20 चा अंतिम सामना कोलंबोमध्ये खेळवला जाईल.
2026 च्या टी-20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार- (T20 World Cup 2026)
2024 च्या टी-20 विश्वचषकाप्रमाणे, 2026 च्या टी-20 विश्वचषकात देखील 20 संघ असतील, ज्यांना प्रत्येकी पाच संघांच्या चार गटांमध्ये विभागले जाईल. टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नसले तरी, आयसीसीने सर्व सहभागी देशांना स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख आणि अंतिम फेरीची माहिती दिली आहे.
आतापर्यंत 15 संघ 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र- (15 teams qualify for 2026 T20 World Cup)
आतापर्यंत, 15 संघ 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत, ज्यात पाच जागा रिक्त आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अमेरिका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली हे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित पाच संघांपैकी दोन संघ आफ्रिकन प्रादेशिक पात्रता फेरीतून येतील, तर तीन संघ आशिया आणि पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून येतील.
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.