टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहि
BCCI बक्षीस रक्कम टीम इंडिया: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील (T20 World Cup 2026) फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपद पटकावलं. यानंतर काल बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियासाठी 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. विश्वविजेत्या टीम इंडियाला आयसीसीकडून 27.48 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले. त्यानंतर बीसीसीआयकडून टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. भारतीय संघाने 2024 मध्ये जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. म्हणजे 2024 पेक्षाही 6 कोटी रुपये जास्त यंदा बीसीसीआयने टीम इंडियाला दिले आहेत. आता हे पैसे कुणाला कसे मिळणार, या पैशांचे वाटप कसं होणार, याबाबत माहिती समोर आली आहे. (BCCI Give Team India Prize Money)
कुणाला किती पैसे मिळतील? (BCCI ने टीम इंडियाला T20 विश्वचषक 2026 ची बक्षीस रक्कम दिली)
बीसीसीआयकडून मिळणारी ही बक्षीस रक्कम खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाते. वृत्तानुसार, रकमेतील सर्वात मोठा भाग खेळाडूंना जातो, तर उर्वरित रक्कम प्रशिक्षक कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांमध्ये वाटली जाते. गेल्या वर्षी जेव्हा भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा बीसीसीआयने 58 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हा टीम इंडियाला 51 कोटींचे बक्षीस मिळाले.
एमएस धोनी, रोहित शर्मा आणि आता सूर्यकुमार यादव- (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)
आतापर्यंत, टीम इंडियाने तीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला आहे. प्रथम, 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, नंतर 204 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने 2014 च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला, परंतु श्रीलंकेने तो अंतिम सामना ६ विकेट्सने जिंकला. अशाप्रकारे, भारताने आता तीन टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या आहेत.
रताचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली. सलामीच्या संजू सॅमसननं सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलेलं वेगवान अर्धशतक भारताच्या या डावाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 46 चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांसह 89 धावांची खेळी उभारली. संजू सॅमसननं अभिषेक शर्माच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 98 धावांची आणि ईशान किशनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी रचली. भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करून न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या चिंधड्या उडवल्या. त्यामुळंच भारतीय डावाच्या आठव्या षटकात शतक आणि 15व्या षटकात द्विशतक धावफलकावर लागलं. पण जेम्स नीशामनं 16व्या षटकांत तीन फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या डावाला ब्रेक लावला. त्याआधी, अभिषेक शर्मानं 21 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 52 धावांची, तर ईशान किशननं 25 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 54 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी मोठे फटके खेळून भारताला पाच बाद 255 धावांचा पल्ला गाठून दिला.
न्यूझीलंडचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)
256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.