T20 World Cup 2026: संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख कोणती? सर्व 20 संघांना 'या' तारखेपर्यंत करता येणार बदल!
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 चे आयोजन 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत (India & Shrilanka) संयुक्तपणे केले जाणार आहे.
बीसीसीआयने (BCCI) सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. मात्र, आयसीसीच्या नियमांनुसार या संघात अजूनही बदल करण्याची संधी आहे. 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या हाय-व्होल्टेज सामन्यासह एकूण 14 सामने श्रीलंकेत होतील.
जर पाकिस्तान संघ उपांत्य (Semifinal) किंवा अंतिम (Final) फेरीत पोहोचला, तर त्यांचे ते सामने देखील श्रीलंकेतच खेळवले जातील. आतापर्यंत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, ओमान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या 7 देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजसह उर्वरित 13 संघांची घोषणा होणे अजून बाकी आहे.
8 जानेवारीपर्यंत सर्व देशांना आपल्या 15 खेळाडूंची प्राथमिक यादी आयसीसीकडे जमा करणे बंधनकारक आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी एक आठवडा आधीपर्यंत 31 जानेवारीपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय संघात बदल करता येईल.
31 जानेवारीनंतर किंवा स्पर्धा सुरू असताना बदल करायचा असल्यास, केवळ खेळाडू जखमी झाल्याच्या स्थितीतच आयसीसीच्या परवानगीने बदल करता येईल. 20 संघांना प्रत्येकी 5 याप्रमाणे एकूण 4 गटांत (Groups) विभागले आहे. भारत आणि पाकिस्तान हे ‘ग्रुप ए’ मध्ये आहेत. प्रत्येक गटातील पहिले 2 संघ ‘सुपर 8’ फेरीसाठी पात्र ठरतील, त्यानंतर नॉकआउट (उपांत्य आणि अंतिम फेरी) सामने होतील.
Comments are closed.