हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी! केले 2026 वर्ल्ड कपचे टॉप 4 संघ जाहीर, तर पाकिस्तानचा पत्ता कट

7 फेब्रुवारी 2026 पासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून, त्यांची चार गटांत (Groups) विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 5 देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वर्ल्ड कपचे यजमानपद भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka) यांच्याकडे आहे.

या आगामी स्पर्धेबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने उपांत्य फेरीत (Semi-final) पोहोचू शकणाऱ्या 4 संघांची नावे सांगितली असून, पाकिस्तानला मात्र या शर्यतीतून बाहेर ठेवले आहे.

हरभजन सिंगने टी-20 वर्ल्ड कप 2026 बाबत चर्चा करताना भारत, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ सेमीफायनलमध्ये जाण्याचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले. त्याने असा विश्वास व्यक्त केला की, टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावेल. आपल्या भविष्यवाणीत त्याने पाकिस्तानचा साधा उल्लेखही केला नाही, ज्यातून पाकिस्तानचा संघ टॉप 4 मध्ये पोहोचू शकणार नाही, असाच संकेत त्याने दिला आहे.

Comments are closed.