टी20 वर्ल्डकपमध्ये नवा ट्विस्ट, पाकिस्तानने माघार घेतली तर बांग्लादेश खेळणार!

टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. भारत आणि श्रीलंकेत या स्पर्धेचे सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेतून बांग्लादेश क्रिकेटने सुरक्षेच्या कारणामुळे माघार घेतली असून त्यांच्याजागी स्कॉटलंड खेळणार हे आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले. बांग्लादेशच्या माघारीनंतर पाकिस्तान क्रिकेटनेही ते या स्पर्धेत खेळणार नाही असे वक्तव्य केले आहे. जर पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर झाला तर त्यांची जागा बांग्लादेश घेणार असे समोर येत आहे.

काही सूत्रानुसार, पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली तर आयसीसी त्यांच्याजागी बांग्लादेशला खेळवू शकतो. पाकिस्तान या स्पर्धेत गट अ मध्ये असून त्यांचे सर्व साखळी सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. दुसरीकडे बांग्लादेशला या स्पर्धेत खेळायचे असून त्यांना त्यांचे सामने भारतात नाही तर श्रीलंकेत खेळवण्याची अट आयसीसीसमोर ठेवली होती. आता त्यांनी या स्पर्धेत पाकिस्तानची जागा घेतली तर ते गट अ मध्ये येत सर्व सामने श्रीलंकेत खेळतील.
पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार कि नाही यासाठी त्यांना अंतिम निर्णय घेण्याची मुदत शुक्रवारपर्यत दिली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी सोशल मीडियावर म्हटले, “मी आमचे पंतप्रधानांची भेट घेतली असून त्यांना आयसीसीबाबत सांगितले. त्यांनी मला सर्व स्तरावर विचार करून हे प्रकरण सोडवा, असे सुचविले. यामुळे आम्ही शुक्रवार किंवा पुढच्या सोमवारी योग्य निर्णय घेऊ.”

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहे. त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेसाठी संघ न पाठवण्याचा आणि भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहे. या स्पर्धेत पाकिस्तान त्यांचा पहिला सामना नेदरलॅंड्स विरुद्ध ७ फेब्रुवारीला कोलंबो येथे खेळणार आहे.

Comments are closed.