पाकिस्तान OUT, बांगलादेश IN…; टी-20 विश्वचषकाआधी होणार मोठी घडामोड, नेमकं काय घडतंय?

T20 विश्वचषक 2026: टी-20 विश्वचषकाचा थरार 7 फेब्रुवारीपासून रंगणार (T20 World Cup 2026) आहे. मात्र त्याआधी बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan) चांगलीच चर्चा रंगली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 वर्ल्डकपमधील आमचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात यावे, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आली होती. मात्र बांगलादेशची ही मागणी आयसीसीने फेटाळली. यानंतर बांगलादेशने टी-20 विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सदर प्रकरणानंतर बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला विश्वचषकात स्थान देण्यात आलं. मात्र आता टी-20च्या विश्वचषकात पुन्हा एकदा बांगलादेशची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, आयसीसीने बांगलादेशची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं विरोध करत टी-20 विश्वचषकातील भारतविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जर पाकिस्तानने टी-20 विश्वचषकातून माघार घेतल्यास बांगलादेशला आयसीसीकडून पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. सुरुवातीला बांगलादेशला भारतात सामने खेळण्यास नकार दिल्याबद्दल स्पर्धेतून वगळण्यात आले होते आणि त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला होता. आता, जर पाकिस्तानने माघार घेतली तर आयसीसी बांगलादेशला दुसरी संधी देऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, या परिस्थितीत बांगलादेश त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. (T20 World Cup 2026)

टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानचे वेळापत्रक- (Pakistan Schedule T20 World Cup 2026)

7 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स

10 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध अमेरिका

15 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत

18 फेब्रुवारी – नामिबिया विरुद्ध पाकिस्तान

एकीकडे बहिष्कारची भाषा, दुसरीकडे विश्वचषकासाठी संघ जाहीर- (Pakistan TeamT20 विश्वचषक 2026)

एकीकडे टी-20 विश्वचषकात बहिष्कारची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाने दुसरीकडे संघही जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी 15 खेळाडूंच्या संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व सलमान अली आघा करणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे.

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ- (Pakistan Squad T20 World Cup 2026)

सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सॅम अय्युब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान तारिक.

संबंधित बातमी:

Wasim Akram On Pakistan Team T20 World Cup 2026: बांगलादेशने पाकिस्तान क्रिकेटसाठी काय केलं?, वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेट संघाला सुनावले, नको नको ते बोलला!

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याच्या तयारीत; ICC चे नियम काय?

आणखी वाचा

Comments are closed.