IND Vs ENG – इंग्लंडने नाणेफीकाचा कौल जिंकला, सूर्याची सेना प्रथम फलंदाजी करणार
मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये ICC T20 World Cup 2026 ची दुसरी सेमी फायनल खेळली जात आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार असून संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हिंदुस्थान आणि इंग्लंड तिसऱ्यांना सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. यापूर्वी 2022 साली उभय संघांमध्ये पहिल्यांदा सेमी फायनलमध्ये द्वंद्वं झालं आणि या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. हिंदुस्थानने याचा वचपा 2024 साली काढला आणि इंग्लंडला पराभवाची धुळ चारली. आता पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये तुंबळ युद्ध पाहायला मिळेल. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला धुळ चालत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला भिडण्यासाठी टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये चढाओढ पाहायला मिळेल आणि चाहत्यांना एक रंगतदार सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
हिंदुस्थानचा संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदिप सिंग, वरूण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह
इंग्लंडचा संघ
फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियान डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद
Comments are closed.