तिलक, सुंदर OUT आणि संजू,अक्षर IN? सूर्यकुमार यादव झिब्बाब्वे विरुद्ध कोणाला संधी देणार?
चेन्नई: टी 20 वर्ल्ड कप सध्या रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. आशिया संघातील किमान एक संघ तरी उपांत्य फेरीत पोहोचणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांगलादेश भारतात न खेळण्याच्या भूमिकेमुळं टी 20 वर्ल्ड कप बाहेर गेला. आता पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत यांचा उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी संघर्ष सुरु आहे. सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात उद्या सामना होणार आहे. भारताला हा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे. या मॅचसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसनला संधी मिळणार?
झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघात संजू सॅमसन, अक्षर पटेल यांना संधी मिळू शकते. तर, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर ठेवलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे. रिंकू सिंग वैयक्तिक कारणामुळं संघासोबत नसल्यानं त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर असू शकतो.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील भारतात खेळवला जाणारा हा पहिला टी 20 सामना असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा 76 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळं उपांत्य फेरीत पोहोचायचं असल्यास भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यावर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल.
भारतीय संघ दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांसह डावाची सुरुवात करत आहे. यामुळं विरोधी संघ ऑफ स्पिनर गोलंदाजांना संधी देत असल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय भारतीय संघा डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक आहे. त्यामुळं विरोधी संघांच्या रणनीती अडकू नये यासाठी टीम मॅनेजमेंट संजू सॅमसनला संधी देऊ शकते. यामुळं सलामीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन येऊ शकतात.
ईशान किशन देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याला तिसऱ्या स्थानी फलंदाजीला पाठवलं जाऊ शकतं. तिलक वर्मा देखील आशिया कप मध्ये जशी फलंदाजी केली होती त्या प्रकारची फलंदाजी करु शकलेला नाही. रिंकू सिंगला फलंदाजीसाठी फार संधी मिळाली नाही. रिंकू वैयक्तिक कारणामुळं संघासोबत नसल्यानं त्याच्या जागी देखील सूर्यकुमार यादवला कोणाला तरी संधी द्यावी लागेल.
संजू सॅमसनला सूर्यकुमार यादव संधी देऊ शकतो. संजू सॅमसन यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये नामिबिया विरुद्ध 22 धावा केल्या होत्या. त्या डावात संजू सॅमसननं चौकार आणि षटकार मारले होते.
भारताचा संभाव्य संघ : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार) , शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
आणखी वाचा
Comments are closed.