टी-20 मध्ये भारताने 6 वेळा पाकिस्तानविरुद्ध केली आहे प्रथम फलंदाजी! पाहा किती वेळा मिळाला विजय

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील टी-20 विश्वचषकातील ‘ग्रुप-ए’ मधील महत्त्वाचा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर दमदार कामगिरी केली. भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 175 धावा केल्या आहेत.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने यापूर्वी 6 वेळा पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आहे. त्यापैकी 4 वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर केवळ 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
2007 वर्ल्ड कप (लीग मॅच) मध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली होती. सामना टाय झाला, पण ‘बॉल आऊट’मध्ये भारताने विजय मिळवला. तर 2007 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने 157 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 5 धावांनी हरला आणि भारत विश्वविजेता बनला. 2012-13 मालिकेत पहिला सामन्यात भारताने 133 धावा केल्या होत्या. हा सामना पाकिस्तानने 5 गडी राखून जिंकला. तसेच 2012 मालिकेत दुसऱ्या सामन्यात अहमदाबादमध्ये भारताने 192 धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तानला 181 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने 11 धावांनी विजय मिळवला.
2021 टी-20 वर्ल्ड कपमधील या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. 2024 टी-20 वर्ल्ड कप न्यूयॉर्कमध्ये भारताने केवळ 119 धावा केल्या होत्या, तरीही भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला 113 धावांत रोखले आणि 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.
Comments are closed.