'आम्ही भारताला गुडघ्यावर आणणार…’, दक्षिण आफ्रिकन कोचचे वादग्रस्त विधान! भारतीय चाहत्यांमध्ये संतापाची लाट

कोलकाता कसोटी जिंकणारा दक्षिण आफ्रिका संघ गुवाहाटीतही विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. चौथ्या दिवशी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर तब्बल 549 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 27 धावांवर दोन विकेट गमावल्या. साई सुदर्शन आणि कुलदीप यादव नाबाद परतले.

आता शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 522 धावा कराव्या लागणार आहेत, जे जवळपास अशक्य आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी अजून 8 विकेट घ्यायच्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कोनराड यानी एक मोठे विधान केले आहे, ज्यामुळे भारतीय चाहत्यांचा संताप वाढू शकतो.

शुकरी कोनराड यांच्या या विधानामुळे तणाव निर्माण होऊ शकतो, पण त्यांनी सांगितले की ते इंग्लंडच्या दिवंगत कर्णधार टोनी ग्रेग यांच्या प्रसिद्ध मुलाखतीतील एक वाक्य वापरत आहेत, जे त्यांनी 1976 मध्ये क्लाईव्ह लॉइड यांच्या वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या मालिकेपूर्वी म्हटले होते. त्या मालिकेत इंग्लंडचा 0-3 असा पराभव झाला होता.

चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोनराड म्हणाले, “आम्हाला हवे होते की भारतीय संघाने मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवावा. आम्हाला हवे होते की ते गुडघ्यावर बसावेत (हे वाक्य मी चोरत आहे) आणि आम्ही सामना त्यांच्या आवाक्याबाहेर न्यायचा होता.”

कोनराड यांनी यासाठी ‘ग्रोवेल’ हा शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. ग्रोवेल म्हणजे जमिनीवर वाकणे किंवा रांगणे. दक्षिण आफ्रिकी वंशाचे गोरे क्रिकेटर टोनी ग्रेग यांनी हा शब्द दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद आणि कॅरिबियन खेळाडूंच्या संदर्भात वापरला होता.

सध्या हे स्पष्ट झालेले नाही की क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने विरोधी संघाबद्दल अशा प्रकारचा आक्षेपार्ह संदर्भ देणाऱ्या आपल्या कृष्णवर्णीय कोचशी चर्चा केली आहे की नाही. कोनराड यांना विचारण्यात आले होते की पारी घोषित करण्यात इतका उशीर का झाला आणि यामुळे सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो का.

यावर त्यांनी पुढे सांगितले,
“काही गोष्टी होत्या. आम्हाला नवी चेंडूची सर्वोत्तमरीत्या उपयोगिता करून घ्यायची होती आणि सकाळी नवा, अधिक कठोर चेंडू मिळेल. त्याशिवाय आम्हाला भारतीय खेळाडूंना शक्य तितका वेळ क्रीजवर ठेवायचे होते. काही जण म्हणतील की आम्ही खूप वेळ फलंदाजी केली, पण मला तसे वाटत नाही.”

Comments are closed.